Hottest pics
Loading...
Wednesday, 24 February 2021

गंदी बात: धातू

Hot Indian Desi Girl,hot indian(desi) babies,mobile girls chat,sexy single girls from India,My name is NEHA and Seeking Men,A 100% free dating site for India

गंदी बात: धातू

----------------------

सकाळी एका हॉस्पिटलमधून निवासी डॉक्टरांचा कॉल आला.
"सर, एक रेफरन्स आहे, ICU बेड नंबर तीन वर. सुसाईड attempt आहे. किती वाजता याल?"
'आत्महत्याचा प्रयत्न' ही आमच्या मानसशास्त्रातील एक महत्त्वाची emergency. अश्या रुग्णांना प्राध्याण्याने पाहणे गरजेचे असते.कारण कुठूलाही असा आत्महत्येचा प्रयत्न दुर्लक्षित करणे हे भविष्यातील संकटांना आमंत्रण देण्यासारखं असते.
हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर रुग्ण पाहण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांच्या कडून रुग्णाविषयी आणि घडलेल्या घटनांविषयी माहिती घेणे गरजेचे असते. सदर रुग्णाचे जवळचे नातेवाईक कोणी नव्हते. माहिती देणारे होते तो ज्या कंपनीत काम करत होता त्याचे मालक दिनकरराव.
"ब्रिजेश बद्दल काही माहिती असेल तर सांगा?" मी त्यांना विचारले.
"सर,माझ्याकडे कारखान्यात पाच वर्षे झाली काम करतो आणि तिथेच राहतो. लग्न ठरलं आहे त्याच. गावी जाणार होता काही दिवसात.अस काही फाशी लावून घेईल अस कधी वाटलं नव्हतं " दिनकररावांनी अगदी सविस्तर ब्रिजेश विषयी माहिती दिली.
"असे का केले असेल?तुम्हाला काही कारण माहिती आहे का?" मी आत्महत्याच्या प्रयत्नाचे गुढ उकळण्यासाठी प्रश्न केला.
"माहीत नाही साहेब, पण लग्न ठरल्यापासून थोडा टेन्शनमध्ये वाटत होता.एकटा एकटा राहत होता.कामात पण लक्ष कमी झालं होतं.विचारलं तर 'काही नाही काका' अस बोलला" दु:खी चेहऱ्याने दिनकरराव बोलले.
मी ICU मध्ये गेलो. ब्रिजेश म्हणजे एक वीस वर्षाचा सडपातळ तरुण. गळ्यावर पूर्ण ड्रेसिंग.निस्तेज चेहरा. खोल गेलेलं डोळे आणि विचारात खोल बुडालेले मन. आपण वाचलो याच्या आनंदापेक्षा,आपण का वाचलो? याच दु:ख असणारा चेहऱ्यावरिल भाव.
मी माझी मानसोपचार तज्ञ म्हणून ओळख करून दिली आणि विचारले
" कसा आहेस? एवढा मोठा निर्णय का घेतलास? काही समस्या असतील तर बोल,आपण मिळुन काही ना काही मार्ग काढू!"
तो बराचवेळ निशब्द होता. खूप प्रयत्न केल्यावर तो बोलला
"खूप 'गंधी बात' आहे डॉक्टर.तुम्हाला नाही समजणार.माझं जिवंत राहून काय फायदा नाही.आता सर्व संपलं आहे."
हे बोलताच मी जे समजायचे ते समजून गेलो. मी माझ्या खिशातून माझं विसिटिंग कार्ड काढलं आणि त्याला देऊन मी बोललो, "मित्रा; मीच तुझी मदत करू शकतो.मिच आहे 'गंदी बात' का 'सिधासाधा डॉक्टर' आपली ओळख करून देताना मनोविकारतज्ञ बरोबर 'लैगिंक समस्यातज्ञ' म्हणून ही करून दयावी हा धडा मी शिकलो आणि त्यानंतर आज मी माझी 'पूर्ण' ओळख करून देतो.
कार्ड वाचून त्याला थोडा धीर आला व तो बोलला
" डॉक्टर, माझं लग्न होणार आहे. पण मी कमजोर झालो आहे.माझी सेक्स पावर पूर्ण संपली आहे.स्वप्न दोष होऊन माझा धातू पूर्ण संपला आहे. वीर्य एकदम पातळ झालं आहे. खूप डॉक्टरांना दाखवल, जडी बुटी, तेल, महागडी औषधे घेतली पण काही फायदा नाही झाला. आता तर लिंगात ताकत पण नाही येत. लग्न करून समोरच्या पोरीचं आयुष्य बरबाद करण्यापेक्षा मेलेलं बर. समाजात नाव पण खराब नको" त्याच्या ओल्या डोळ्यातून दुःखी आणि अपराधीपनाच्या भावना ओसंडून वाहत होत्या.मी केसपेपर औषधे लिहली आणि दोन दिवसांनी दिनकरराव सहित क्लिनिकला बोलवलं.
"तुला स्वप्नदोषांची समस्या कधी पासून आहे. धातू कधी जातो?" मला त्याच्या मनात अजून काय चाललं आहे समजून घ्यायच होत.
" सर,लहानपणी हस्तमैथुन करायचो.पुढे ती वाईट सवय पूर्ण बंद केली. मग काही दिवसांनी रात्री झोपेत चड्डी ओली होऊ लागली.कधी संडास करताना जोर दिला की धातू जात होता.लघवी केली की लघवीत धातूचा फेस दिसत होता.काही रोमँटिक मूवी बघितला की लिंगातून धातू बाहेर येऊन चिपचिपपणा वाटतं होता." त्यानं अगदी सविस्तर खाली मान घालून सर्व सांगितले.
"अरे पण धातू गेल्याने काय नुकसान झालं?" मी त्याच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी विचारले.
"सर,वीर्यनाश म्हणजे मृत्यू. मी एका पुस्तकात वाचले आहे. धातू गेल्याने सर्व शरीर कमजोर झाले आहे. चेहऱ्यावरिल तेज निघून गेल आहे. वजन कमी झालं आहे.अंगात ताकद नाही आहे.आता तर लिंग पण कमजोर झालं आहे. ताकदसुद्धा येत नाही त्याच्यात आता"
त्याने आपला सर्व त्रास सांगितला.
बोलताना त्याची भिती आणि त्रास जाणवत होता.
स्वतःच्या स्वयंघोषित लैगिंक समस्याच्या गुन्हात त्यानं स्वतःला अपराधी ठरवलं होतं आणि शिक्षा म्हणून आत्महत्याचा प्रयत्न केला होता.आजही असे अनेक ब्रिजेश आत्महत्यांच्या 'ब्रीज' चालताना मला दिसतात. खर तर ही 'आत्महत्ये'चा प्रयत्न नव्हता तर लैगिंक शिक्षणाच्या अभावामुळे झालेला 'हत्ये'चा प्रयत्न होता.
त्याच्या समस्या लैगिंक होत्या पण आजार हा समाजनिर्मित मानसिक होता.अज्ञान,भितीच्या विचाराने मानसिकता बदलून शरीरात बदल त्याला जाणवत होते. लैगिंक शिक्षण आशावादी विचार आणि उदासीनता कमी करण्यासाठी औषधे हा त्यावर योग्य उपचार होता.
"धातू म्हणजे वीर्य.ते कसे बनते तुला माहीत आहे का?" मी समुपदेशनाला सुरवात केली.
"डॉक्टर, विर्यचा एक थेंब रक्ताच्या पन्नास थेंबापासून बनतो. विर्य खूप अनमोल असते. त्याचा नाश म्हणजे मृत्यू." तो बोलला आणि त्याच्या त्या बोलण्याला दिनकररावांनी अनुमोदन केले.
मला हेच उत्तर अपेक्षित होते.मी माझा opd पेपरवर चित्र काढलं.आणि त्यांना म्हणालो,
" वीर्य हे वृषण, प्रोस्टेट आणि इतर ग्रंथीमध्ये बनणारा नैसर्गिक पदार्थ आहे. ते जर रक्तपासून बनत असते तर त्याचा रंग लाल हवा होता. शरिरात जसे लाळ, मूत्र, रक्त, घाम बनतो तसेच वीर्य बनते. विर्य शरीरातून बाहेर पडले की ते दिवसभरात पुन्हा बनते. त्यामुळे विर्य नाश म्हणजे मृत्यू हे चुकीचे आहे. मुलांना जन्म देण्यासाठी शरीराने बनवलेला एक साधा पदार्थ आहे. त्याला अनमोल आणि अदभूत मानल्याने अतिमहत्त्व दिल्याने हे गैरसमज आणि भिती तयार होतात." मी माझी चित्रकला वापरून त्याच्या डोक्यातील अज्ञानाचे चित्र पुसुन टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.
" डॉक्टर धातू गेल्याने ही पोर घाबरतात. आणि वीर्य आपोआप कसे काय बाहेर येते? स्वप्नदोष कसा होतो?" दिनकररावांनी सुद्धा चर्चेत भाग घेतला होता.
"पाण्याची टाकी जर पाण्याने भरली असेल आणि तरीही आपण पाणी भरत राहिलो तर काय होईल?" मी त्यांना विचित्र प्रश्न केला.
" ओव्हरफ्लो होईल की डॉक्टर. पाणी टाकीबाहेर सांडेल" ते बोलले.
" स्वप्नदोष म्हणजे असाच विर्याचा ओव्हरफ्लो. धातू शरीरातुन बाहेर पडण्याचे तीन मार्ग. एक तर शारीरिक संबंध किंवा हस्तमैथुन वा असा ओव्हरफ्लो. ब्रिजेशचा लैगिंक संबंध नाही येते, हस्तमैथुन तो करत नाही पण धात बाहेर पडणार कुठून. स्वप्नदोष ही नैसर्गिक आणि योग्य रस्ता आहे धातू बाहेर पडण्याचा. तुम्हाला आणि आम्हाला आता स्वप्नदोष होतो का?" माझ्या या बोलण्यावर दिनकररावही हसले.संदर्भासहित स्पष्टीकरण मिळाल्याने डोक्यात ज्ञानाची ट्यूब पेटली होती.
"सर , पण मला जी शरिरात कमजोरी जाणवते त्याच काय? धात जाऊन कमजोरी येते काय?" ब्रिजेशने शंका विचारली.
"ब्रिजेश बेटा, समज तुला तर दहा दिवस संडास वा लघवी झाली नाही तर काय करशील?" मी प्रश्न केला.
"दवाखान्यात जावं लागेल.डॉक्टरकडून एनिमा वा ऑपरेशन करावं लागेल. संडास, लघवी रोजच्या रोज व्हावी लागते" तो बोलला.
"अरे, तसेच जर तुझा धातू बनत नसेल वा तो बाहेर येतच नसेल तर तुला डॉक्टरकडे जावे लागेल. वयात आल्यावर धातू बनणं आणि तो वेळोवेळी बाहेर पडणे गरजेचे आहे. जुना धातू स्वप्नदोषा वेळी जातो आणि नवीन चांगला धातू बनतो.'स्वप्नदोष' हा खर तर दोष नव्हे तर 'गुण' आहे.आपण उगच त्याला गुन्हा समजतो आणि स्वतःला गुन्हेगार. धातू बनतो म्हणजे तू मुलांना जन्म देऊ शकतो. धातू जाण चांगलच आहे वाईट नाही.ते वाईट आहे असा गैरसमज होऊन आपण चिंताग्रस्त होतो,नैराश्यात ढकलले जातो.त्याचाच परिणाम आपल्याला शारीरिक कमजोरी,थकवा जाणवतो." मी त्याला समजावून सांगितले.
"सर,काही वेळा रोमँटिक मूवी पहिला की लिंग ओल होत आणि लघवीला फेस येतो.ते कसे होते?" आपल्या मनाच्या पेटारातील सर्व प्रश्न त्याने बाहेर काढले होते.
" अरे, ते विर्य नसतेच मुळी. पुरूष कामोत्तेजित झाला की त्याचा लिंगाचा पुढचा भाग तिथे असणाऱ्या ग्रंथीने ओला होतो. संबंधावेळी त्याचा वापर वंगणासारखा होतो. लघवीनंतर होणारा फेस ही विर्य नसते तर बऱ्याचवेळा फॉस्फेट नावाने केमिकल शरीरातून बाहेर पडून असा फेस होतो" मी त्यांच्या प्रश्नांना अचूक उत्तर दिलं होतं.
"सर,शेवटचा प्रश्न.धातू पातळ असेल आणि पिचकारी सारखा जोरात बाहेर येत नसेल तर मूल होत नाहीत अस म्हणतात! खरे आहे का?" ब्रिजेशने विचारले.
"शरीरातुन बाहेर पडल्यावर धातू बाहेरील वातावरणात पातळ होतो.तसे होणे गरजेचे असते. पातळ धातूंतून शुक्राणू वेगाने जाऊ शकतात आणि मुले होण्यास मदत होते. तुपासारखे घट्ट वीर्य काही कामाचे नसते. आणि तरुणपणी मजबूत स्नायूंच्या साह्याने वीर्य लिंगातून पिचकारी सारखे बाहेर येवू शकते, काही वर्षांनी काही लोकांच्यात ते थेंब थेंब येते. त्याचा मूल होण्याचा काही संबंध नाही. मुलं होण्यासाठी विर्यामध्ये योग्य प्रमाणात,वेगात धावणारे शुक्राणू हवेत " मी त्याची शंका दूर केली आणि पेपरवर निदान लिहले 'धात सिन्ड्रोम'.
"सर , ब्रिजेश सारखी माझ्याकडे अनेक सुशिक्षित अज्ञानी मुले कामाला आहेत.तुम्ही त्यांना येऊन लेक्चर दयाल व चर्चा कराल का? हवे ते मानधन मी देईन.खूप गरजेचं आहे हे ज्ञान नाही तर अजून कुणीतरी फासावर लटकेल!" दिनकरराव बोलले. असे दिनकरराव जर गावोगावी जन्मले तर लैगिंक आरोग्याचे 'सुदिन' दूर नाहीत असे म्हणत मी लगेच होकार दिला.
गैरसमज आणि अज्ञानाने तयार झालेला हा 'धात सिन्ड्रोम' फक्त आणि फक्त आशियातील देशात दिसतो. माणसा सारखा माणूस तयार करणारा 'वीर्य' हा अतिमौल्यवान पदार्थ आहे या संकल्पनेतून तयार झालेली ही मनोकायिक लैगिंक समस्या आहे. याचा उगम होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, आपल्या देशात लैगिंक शिक्षण हे शालेय आणि महाविद्यालय शिक्षणात कधीच शिकवलं जातं नाही.पाश्चात्य देशाकडून ही गोष्ट शिकली पाहिजे.
'सेक्स'च्या समस्यांना आजही 'गंदी बात' मानले जाते. त्यावर बोलणे चर्चा करणे अश्लील मानलं जातं.मग बोलणाचे मार्ग आणि ठिकाणे आस्तित्वात कसी येणार. मित्रांकडून , जुन्या कालबाह्य पुस्तकातुन, इंटरनेट वरून चुकीची रंगीन माहिती घेऊन ही 'गंदी बात' अजून जास्त गंदी होते...ज्या गोष्टीतुन पूर्ण सृष्टीची निर्मिती झाली ती 'गंदी बात' कशी असू शकते...बोललोच नाही , शिकलोच नाही तर भीतीच्या आणि चिंतेच्या कचऱ्याची दुर्गंधी सर्व मनात पसरणार....योग्य लैगिंक शिक्षण जर दिल गेलं तर 'गंदी बात' ही 'सुगंधी होऊन अनेक अनेक संसार सुखाने दरवळत राहतील.
डॉ सुरेश पाटील

0 comments:

Post a Comment

Copyright © 2013 A 100% free dating site for India Desi Image Only,Hot Masala Scene from B-Grade Hindi Movie,Share short clips and video scenes here.All Right Reserved